Explore the latest news, achievements, and media coverageGK Foundation Pune. From CSR initiatives, community welfare programs, educational campaigns, health drives, to impactful partnerships, our news & media updates keep you informed about how we are creating meaningful change in Pune. Stay connected, be inspired, and see how your support contributes to real-world impact.
धाराशिव जिल्ह्यात फाउंडेशनच्या माध्यमातून गरजू व गरीब मुलांना मोफत हृदय शस्त्रक्रियेची संधी उपलब्ध झाली आहे. या उपक्रमामुळे अनेक मुलांचे जीवन वाचणार असून पालकांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे.
पुण्यातील जी.के. फाऊंडेशनने शंभर वर्षांच्या कॅन्सरग्रस्त आजीवर मोफत शस्त्रक्रिया करून मोलाची मदत केली. या उपक्रमामुळे आजीचे जीवन वाचले असून कुटुंबीयांनी समाधान
व्यक्त केले.
सामाजिक संस्थांच्या सहकार्याने आयोजित आरोग्य शिबिरात २२३३ नागरिकांची तपासणी करण्यात आली. या उपक्रमात पोलिस अधिकारी, डॉक्टर व विविध सामाजिक संघटनांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
GK फाउंडेशन पुणे व स्थानिक संस्थांच्या सहकार्याने ३५ रुग्णांना मोफत नेत्रशस्त्रक्रियेसाठी रवाना करण्यात आले. मोतीबिंदूसह इतर नेत्रविकारांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात
येणार आहे.
उमरगा येथे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आयोजित आरोग्य शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला. आरोग्य तपासणीसह विविध आजारांवरील मार्गदर्शन करण्यात आले.
ज्ञानज्योती सामाजिक संस्थेच्या वतीने पर्यावरण संवर्धनासाठी दहा हजार वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला. या उपक्रमाद्वारे पर्यावरण संरक्षणासोबतच ग्रामीण भागात हरितक्रांती घडवली जाणार आहे.
उमरगा येथे आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात पोलिस, होमगार्ड आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. मोठ्या प्रमाणावर नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली.
नेत्रसंपदा फाउंडेशन व स्थानिक संस्थांच्या सहकार्याने माकणीत नेत्र तपासणी शिबिर पार पडले. ३८३ रुग्णांची तपासणी करून निवडक रुग्णांना मोफत शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले.